आज पहिल्या टप्प्यात कोरोना @ ३४ रुग्ण

Foto
जिल्ह्यात आज सकाळी पहिल्या टप्प्यात कोरोनाच्या अहवालानुसार ३४ रुग्ण वाढले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधीतांची संख्या ही १२९४२ वर जाऊन पोहचली आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत 12942 कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी ८१५९ जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत ४३७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर सध्या ४३४६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 
शहरात आढळले ३४ रुग्ण
शहरात आणखी ३४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात नक्षत्रवाडी -२, भावसिंगपुरा -१, छत्रपतीनगर, बीड बायपास -१, राजीव गांधीनगर -१, छावणी परिसर-३, पन्नालालनगर -३, पदमपुरा -१, खोकडपुरा -१, टाऊन सेंटर -२, पंचशीलनगर -५, आयोध्यानगर -२, ठाकरेनगर, एन दोन -१, चेलिपुरा -१, एन दोन सिडको -१, धूत हॉस्पीटल परिसर-१, हर्सुल -३, बन्सीलालनगर-२ या भागातील रुग्ण आढळून आले आहेत. 
ग्रामीण भागात वाढले ३ रुग्ण 
ग्रामीण भागात आज सकाळी आलेल्या कोरोनाच्या अहवालात ३ रुग्ण आढळून आले आहेत. हे रुग्ण वैजापूर-१, वडगाव कोल्हाटी, बजाजनगर-१, लक्ष्मी कॉलनी, गंगापूर-१ या भागातील आहेत.